पंतच्या दिल्लीसाठी आता प्रत्येक लढत महत्त्वाची; लखनौविरुद्ध आज सामना | IPL Today Match 2022 DC VS LSG | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl today match 2022 DC VS LSG

पंतच्या दिल्लीसाठी आता प्रत्येक लढत महत्त्वाची; लखनौविरुद्ध आज सामना

IPL Today Match 2022 : संभाव्य विजेत्या संघात सुरुवातीला स्थान असलेल्या दिल्ली संघासाठी आता आयपीएलचा दुसरा टप्पा हातघाईच्या लढाईसारखा आहे. आठ सामन्यांतून आठच गुण मिळवत सहाव्या स्थानावर असलेल्या दिल्लीचा आज फॉर्मात असलेल्या लखनौ संघाविरुद्ध सामना होत आहे. (IPL Today atch 2022 DC VS LSG)

लखनौला आता संभाव्य विजेत्या संघांमध्ये स्थान दिले जात आहे. मात्र फलंदाजीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. सुरुवातीच्या सामन्यात त्यांच्या मधल्या फळीकडूनही धावा होत होत्या, आता मात्र राहुल आणि डिकॉक यांच्यावरच त्यांची मदार आहे.

पंड्यावर मदार

कृणाल पंड्या लखनौसाठी हुकमी एक्का ठरत आहे. वरच्या क्रमांकावर फलंदाजीसह गोलंदाजीतही तो निर्णायक योगदान देत आहे. याच अष्टपैलू खेळामुळे तो पंजाब संघाविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्याचा मानकरी ठरला होता. दिल्लीने त्यांच्या अगोदरच्या सामन्यात कोलकता संघावर मात केली, परंतु अजूनही त्यांना सर्वांगीण खेळ करता आलेला नाही. कुलदीप यादव आणि मुस्तफिझुर रेहमान हे गोलंदाज अपेक्षापूर्ण करत आहेत.