Ishan Kishan GT vs MI : ...तर चेंडू पकडता आला असता; रायुडूने इशान किशनला केलं ट्रोल

Ishan Kishan
Ishan Kishan ESAKAL

Ishan Kishan GT vs MI : आयपीएल 2024 च्या पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. मुंबईने सलग 12 व्या हंगामात पराभवाने सुरूवात केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेवेळी मानसिक थकव्याचे कारण देत भारतीय क्रिकेट संघातून ब्रेक घेणारा इशान किशन पहिल्यांदाच व्यावसायिक क्रिकेट खेळाताना दिला.

बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने त्याला रणजी ट्रॉफी खेळून स्वतःला निवडीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. मात्र त्याने याकडे कानाडोळा केला. बीसीसीआयने थेट कारवाईचा बडगा उगारत त्याचा केंद्रीय करार रद्द केला. आज पहिल्या सामन्यात इशान किशन ना विकेटकिपिंग मध्ये चमक दाखवू शकला ना फलंदाजीत त्याला काही करता आलं.

Ishan Kishan
IPL 2024, GT vs MI: काही तरी शिजतय..., मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर ईशान किशन-जय शाह यांच्यात गहन चर्चा, Photo व्हायरल

इशान किशनने विकिटकिपिंग करताना केलेली मिसफिल्ड पाहून समालोचन करणाऱ्या अंबाती रायुडूने त्याला ट्रोल केले. अंबाती रायुडू हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याकडून खेळला असून त्याने 3-3 आयपीएल विजेतेपदं जिंकली आहेत. रायुडू इशान किशनची मिसफिल्ड पाहून म्हणाला की, जर तो रणजी ट्रॉफी खेळला असता तर कदाचित तो हा चेंडू पकडू शकला असता.'

इशान किशनला भोपळाही फोडता आला नाही

इशान किशनला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज अजमजुल्ला उमरजाईने इशानची शिकार केली. यामुळे मुंबईची 1 बाद शुन्य धावा अशी झाली.

Ishan Kishan
GT vs MI : गुजरातनं पांड्याला दिला पराभवाचा धक्का, मुंबई जिंकता जिंकता हरली

गुजरातने हंगामाची सुरूवात केली विजयाने

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने गुजरातला 168 धावात रोखले. दुखापतीनंतर पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी करत गुजरातचे तीन फलंदाज बाद केले. तर गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शनने 39 चेंडूत 45 धावा केल्या. राहुल तेवतियाने देखील 15 चेंडूत 22 धावांची आक्रमक खेळी करत गुजरातला सन्मानजनक धावसंख्या उभारली.

मुंबईने प्रत्युत्तरात खेळताना 20 षटकात 162 धावा केल्या. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविसने तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचत संघाला विजयाच्या जवळ आणले होते. मात्र सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात मोहित शर्माने टिच्चून मारा करत गुजरातला सामना जिंकून दिला.

(IPL Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com