
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता जसजशी पुढे सरकत आहे, तशी रंगत वाढत आहे. काही संघांनी सुरुवातीलाच मोठी भरारी घेतली आहे, तर काही संघांची सुरुवात निराशाजनक राहिली आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठीही फारशी चांगली सुरुवात राहिलेली नाही. त्यांनी चारपैकी ३ सामने गमावले आहेत. यातच मुंबई इंडियन्सला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचीही कमी जाणवत होती.