
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू असतानाच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला होता. एप्रिलच्या सुरुवातीला प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा अचानक मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला होता. त्यामागील कारणाचा खुलासाही झाला नव्हता. केवळ तो वैयक्तिक कारणाने मायदेशी परतल्याचे सांगण्यात आले होते.
पण आता त्याने स्वत:च यामागील कारण सांगितले असून त्याच्यावर बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित पदार्थ त्याच्या शरीरात सापडल्याने त्याच्यावर ही कारवाई झाली.