
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेआधी गेल्यावर्षाच्या अखेरीस मेगा ऑक्शन झाले होते. त्यामुळे अनेक संघात बदल झाले. बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी मिळाली, तर अनेक दिग्गज खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले. या अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियम्सनचाही समावेश आहे.
विलियम्सन २०१५ ते २०२४ दरम्यान झालेल्या सर्व हंगामात खेळला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना २०१७ साली संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले होते. त्याने आयपीएलमध्ये ७९ सामने खेळताना १८ अर्धशतकांसह २१२८ धावा केल्या.
दरम्यान, विलियम्सन जरी आयपीएल २०२५ लिलिवात अनसोल्ड राहिला असला, तरी तो या हंगामात दिसणार आहे, मात्र तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.