Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

Kavya Maran KKR vs SRH : सनराईजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारननं दाखवली खिलाडूवृत्ती
Kavya Maran
Kavya Maran KKR vs SRH esakal

Kavya Maran KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्स राखून पराभव करत सहज आयपीएल 2024 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. केकेआरनंं हैदराबादला 113 धावात गुंडाळलं होतं. हैदराबादचा हा लाजीरवाणा पराभव होता. यापूर्वी आयपीएल इतिहासात फायनल सामन्यात एवढ्या कमी धावा कधी झाल्या नव्हत्या. केकेआरने हे 113 धावांचं आव्हान 11 व्या षटकातच पार केलं. हैदराबादचा दारूण पराभव झाला. पराभवानंतर हैदराबादची मालकीण काव्या मारनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kavya Maran
Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

या व्हिडिओत संघाची मालकीण काव्या मारननं सामना झाल्या झाल्या पराभवाचं शल्य बाजूला ठेवत संघाच्या हंगामातील आतापर्यंतच्या कामगिरीचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. मात्र याचदरम्यान, एवढ्या जवळ येऊन विजेतेपदानं हुलकावणी दिल्यानं तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने कॅमेऱ्यात हे अश्रू टिपले जाऊ नयेत म्हणून तोंड फिरवलं अन् आपले अश्रू पुसले.

याच आयपीएल हंगामात आपण लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंकांना कर्णधार केएल राहुलवर भर मैदानात सुनावताना आपण पाहिलं होतं. अन् याच हंगामात काव्या मारननं आयपीएलच्या फायनलमधील पराभव अत्यंत खिलाडू वृत्तीनं घेत संघाच्या एका पराभवावरून त्यांना दोष न देता त्यांच्या हंगामातील संपूर्ण कामगिरीचं कौतुक करताना पाहिलं.

Kavya Maran
IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

सनराईजर्स हैदराबादनं लीग स्टेजमध्ये सर्वात धमाकेदार कामगिरी केली होती. त्यांनी आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम याच हंगामात मोडला होता. हैदराबाद 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावरून प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाली होती. मात्र पहिल्या क्वालिफायर सामन्यात केकेआरकडून त्यांना पराभव सहन करावा लागला.

त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर 2 मध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैरदाबादने यंदाच्या हंगामात फायनल गाठून आपले गेल्या काही हंगामातील अपयश धुवून काढलं होतं.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com