
पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा, चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या पर्वात पार ढेपाळला आहे. पहिल्या विजयानंतर पुढील पाच सामन्यांत त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात हा संघ प्रथमच सलग पाच सामने हरला आहे आणि त्यापैकी तीन सामने हे घरच्या मैदानावरील आहे.
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व आघाड्यांवर CSK चे खेळाडू शरणागती पत्करताना दिसले. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा नेतृत्व आल्यानंतर पराभवाची ही मालिका खंडित होईल, ही आशा भाबडी होती हे समजले.
काल (११ एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्सने तर धोनीच्या संघाचे वस्त्रहरण केले, तेही चेपॉकवर.. ज्या खेळपट्टीवर चेन्नईच्या संघाने इतकी वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. अजिंक्य रहाणेला हे कसे जमले? त्याने नेमके काय केलं? यासाठी चेन्नईच्या जुन्हा भिडूंचीच त्याला कशी साथ मिळाली?