
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता रोमांचक वळणावर आली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सध्या ८ संघ अजूनही शर्यतीत आहेत, तर दोन संघांचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. त्यामुळे ही चुरस आणखी रंगतदार झाली आहे.
सध्या शर्यतीत असलेल्या संघांमध्ये अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. कोलकाताने १० पैकी ४ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने पराभूत झाले आहेत. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांचे ९ गुण आहेत.