KL Rahul walks away from Sanjiv Goenka video : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुलने ४२ चेंडूत ५७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यानंतरच्या केएल राहुलच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधलं.