
मंगळवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या ४० व्या सामन्यात पराभूत केले. लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवला.
दिल्लीच्या या विजयात केएल राहुलने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने दिल्लीसाठी विजयी षटकारही ठोकला. यासह त्याने एक नवा विक्रमही आयपीएलमध्ये रचला आहे.