
रविवारी (१८ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आयपीएल स्थगित झाल्यानंतर आठवड्याभराने पुन्हा स्पर्धेला सुरूवात झाल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदा खेळताना दिसणार आहेत. या सामन्यादरम्यान केएल राहुलकडेही सर्वांचे लक्ष असेल. त्याला या सामन्यावेळी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.