IPL 2024: आधी घरच्या मैदानात पराभव अन् आता KKR कॅप्टन अय्यरवर BCCI ची कारवाई, राजस्थानविरुद्धची 'ही' चूक भोवली

Shreyas Iyer: राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.
Shreyas Iyer | KKR | IPL 2024
Shreyas Iyer | KKR | IPL 2024Sakal

KKR Captain Shreyas Iyer: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतीधल 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. मंगळवारी (17 एप्रिल) कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

दरम्यान, कोलकाताला या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर पराभवाचा धक्का तर बसलाच, पण आता कर्णधार श्रेयस अय्यरवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात कोलकाता संघाकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात न आल्याने बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे.

Shreyas Iyer | KKR | IPL 2024
GT vs DC : प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंतची 'अग्निपरीक्षा', प्रिन्सच्या गुजरातशी सामना! कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या नियमानुसार षटकांची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर 12 लाखांचा दंड आकारला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा आणि संघातील इतर खेळाडूंवरही 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

त्याचबरोबर तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखांच्या दंडाबरोबरच एका सामन्याची बंदीही घातली जाते. तसेच संघातील इतर खेळाडूंवरही 12 लाख किंवा सामना शुल्कातील 50 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावला जातो.

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये अशी कारवाई होणारा श्रेयस पहिलाच कर्णधार नाही, यापूर्वी शुभमन गिल, ऋषभ पंत या कर्णधारांवरही ही कारवाई झाली आहे.

Shreyas Iyer | KKR | IPL 2024
Kuhoo Garg : भारताच्या नंबर वन बॅडमिंटनपटूची UPSC च्या मैदानातही बाजी, पटकावली 178 वी रँक

कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव

मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सुनील नारायणने 56 चेंडूत 109 धावांची खेळी केली. तसेच अंगक्रिश रघुवंशीने 30 धावा केल्या.

याव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा आकडा पार करता आला नाही. राजस्थानकडून अवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 224 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली. तसेच रियान परागने १४ चेंडूत ३४ धावांची खेळी केली, तर रोवमन पॉवेलने 13 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

कोलकाताकडून हर्षित राणा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com