Virat Kohli IPL 2024 : विराट कोहलीच्या तीन डावात 181 धावा, सरासरी 90.50 तरी निवडसमिती चिंतेत का?

Virat Kohli RCB vs KKR IPL 2024 : विराट कोहली एकटा भिडतोय मात्र निवडसमितीला किंग कोहलीकडून वेगळ्या अपेक्षा आहेत?
Virat Kohli
Virat Kohli esakal

Virat Kohli IPL 2024 : विराट कोहलीने ब्रेकनंतर आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. त्याने 3 डावात 181 धावा ठोकल्या असून त्याची सरासरी ही 90.50 अन् स्ट्राईक रेट हे 141.40 इतके आहे. कोणीही म्हणेल की विराट कोहलीची ही टी 20 क्रिकेटमधील बेस्ट फिगर आहेत.

विराट कोहली सध्या आयपीएल 2024 चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे. त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. विराटचे चाहते त्याच्या कामगिरीवर खुश आहेत. मात्र तरी देखील बीसीसीआयचे निवडसमिती सदस्य चिंतेत आहेत. विराट कोहलीने केकेआरविरूद्ध 59 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. तरी निवडसमिती खुश का नाही.

Virat Kohli
Virat Kohli Rinku Singh : थँक यू विराट भाई.... महत्त्वाच्या सल्ल्यासाठी अन् मोठ्या गिफ्टसाठी रिंकूने मानले किंग कोहलीचे आभार

विराट कोहलीला भारतीय संघातून वगळणे अशक्य आहे. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे त्याला संघातून गळणे शक्य नाही. आयपीएल 2023 मध्ये त्याने 639 धावा केल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये तो पुन्हा धावांचा रतीब घालतोय. जून महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये टी 20 वर्ल्डकप खेळणार आहे.

ब्रेकनंतर परतलेला विराट कोहली चांगल्या टचमध्ये दिसतोय. शुक्रवारी त्याने केकेआरविरूद्ध 59 चेंडूत खेळले. त्यात 27 धावा या एकेरी होत्या तर 8 धावा या दुहेरी होत्या. वयाच्या 35 व्या वर्षी विराट कोहली सारखं कोणी धावू शकतं का?

मात्र या सगळ्या चांगल्या बाजू झाल्या मात्र काही वाईट बाजू देखील आहेत. रॉयल चॅलेंजर बेंगलुरू हे केकेआरकडून हरले. त्यांना फक्त 182 धावाच करता आल्या. केकेआरने हे आव्हान 16.5 षटकात पार केलं. टी 20 वर्ल्डकप 2022 मधील भारताच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माने प्रत्येक फलंदाजाला आपली फलंदाजीची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

Virat Kohli
Hardik Pandya: 'भारतात फॅनवॉर नको...', ट्रोल होणाऱ्या हार्दिकच्या पाठिंब्यासाठी अश्विनसह उतरले 'हे' दिग्गज

रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये अँकर इनिंग अशी काही संकल्पना उरली नसल्याचे देखील सांगितले होते. येत्या काळात भारतीय संघात देखील अँकर इनिंगला कोणतेही स्थान नसल्याचं टीम इंडियाचं व्यवस्थापन मानतं. विराट कोहली हा अँकर इनिंग खेळण्यात तरबेज आहे. आतापर्यंतच्या टी 20 वर्ल्ड चॅम्पियन्सनी या हाणामारी करा अन् बाद व्हा अशा पद्धतीची रणनिती ठेवतच वर्ल्डकप जिंकला आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com