

Abhishek Sharma &Yuvraj Singh
esakal
आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी शतक पूर्ण करत सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पूर्ण २० षटके फलंदाजी केली. त्याने शानदार १३५ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २४२ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्माचे आयपीएलमधील हे दुसरे शतक ठरले. अभिषेकच्या या शानदार खेळीनंतर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत केले. त्याच्या या खेळीनंतर त्याचा मार्गदर्शक युवराज सिंहने विशेष कौतुक केले आहे.