
IPL 2022: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएल 2022 च्या 37 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करून हंगामातील पाचवा विजय नोंदवला आहे. मात्र या विजयानंतरही लखनौच्या संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल आयोजकांनी लखनौ आणि त्याचा कर्णधार केएल राहुल यांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला आहे. लखनौ आणि मुंबई यांच्यातील हा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला होता.(Lucknow Super Giants Fined For Slow Over Rate)
लखनौ सुपर जायंट्सचा या हंगामातील स्लो ओव्हर रेटबाबतचा हा दुसरा अपराध होता. यासाठी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 24 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. तर प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलने या सामन्यात 103 धावांची शतकी खेळी केली.
लखनौ संघाला यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएलच्या २६व्या सामन्यात दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटसाठी राहुलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. IPL 2022 च्या हंगामात लखनौने पहिल्या अपराध केला होता, त्यामुळे कर्णधाराला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता राहुलला 37 व्या सामन्यात दुसऱ्यांदा IPL आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.