
लखनौ सुपरजायंट्स - राजस्थान रॉयल्स यांच्यात कोण मारणार बाजी?
IPL 2022: आयपीएलमध्ये सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अनुक्रमे लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होत असलेला सामना क्वालिफायर-१ सामना खेळण्यासाठी किमान दुसरे स्थान मिळण्यासाठी असेल.
बाद फेरीत क्वालिफायर-१ हा सामना महत्त्वाचा समजला जातो. यातील विजेता थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळत असते. सध्या लखनौचे १६, तर राजस्थानचे १४ गुण आहेत. अजूनही दोघांचा बाद फेरीतील प्रवेश अधिकृतपणे निश्चित झालेला नाही. उद्याचा सामना जिंकून प्रथम बाद फेरीचे लक्ष्य गाठण्यावर लखनौचे उद्दिष्ट असेल.
हेही वाचा: बर्थ डे पार्टीत सनीचा लिपलॉक, रोमँटिक अंदाजानं चाहते घायाळ - Photos
लखनौचा संघ संभाव्य विजेतेपदाचा दावेदार समजला जातो, परंतु गेल्या सामन्यात गुजरातकडून त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या ८२ धावांत त्यांची धुळधाण उडाली होती. त्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाची झाडाझडती घेतली होती.
लखनौची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार के.एल. राहुल, क्विन्टॉन डिकॉक आणि दीपक हुडा यांच्यावर अवलंबून आहे. मधळ्या फळीतील आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म स्पर्धा महत्त्वाच्या टप्प्यात असताना हरपला आहे. आता सर्व अपयश मागे टाकून त्यांना धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा: मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video
दुसऱ्या बाजूला राजस्थान संघातील प्रमुख खेळाडूंचा फॉर्मही कमी झाला आहे. जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांचे योगदान पहिल्यासारखे राहिले नाही. सात सामने वगळ्यानंतर पुन्हा संधी मिळालेला यशस्वी जैसवाल आपली उपयुक्तता सिद्ध करत आहेत, तर बढती मिळालेल्या अश्विनने दिल्लीविरुद्ध अर्धशतक केले होते. हेटमायर मायदेशी परतल्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर झाला आहे.
Web Title: Lucknow Super Giants Look Confirm Play Offs Berth With Over Rajasthan Royals Ipl Lsg Vs Rr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..