इंडियन प्रीमिअर लीग २०२५ संपले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ व्या प्रयत्नात जेतेपद पटकावले, पंजाब किंग्सने सर्वोत्तम कामगिरी करून अंतिम फेरीपर्यंत धडक दिली आणि मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांनीही प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण, अन्य संघांचे काय? बक्कळ पैसा मोजून संघात खेळाडूंचा भरणा केल्यानंतरही काही संघांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि त्यात आघाडीवर राहिला तो लखनौ सुपर जायंट्सचा संघ... आयपीएल इतिहासात सर्वाधिक २७ कोटींची रक्कम या फ्रँचायझीने एका खेळाडूवर खर्च केली.. रिषभ पंतला त्यांनी कर्णधारही केलं, परंतु या संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.