Kumar Sangakkara & Malaika Arora Spotted Together : फिटनेस क्वीन अशी ओळख असलेली मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिचे अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराबरोबर तिचं नाव जोडलं जातं आहे. या दोघेही आयपीएल सामन्यादरम्यान एकत्र दिसल्याने दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनाही उधाण आले आहे.