Mayank Yadav: 'खूप लोक म्हणतात सूर्या अन् बुमराहसारखा...' IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान बॉल टाकणारा मयंक काय म्हणाला पाहा

Mayank Yadav Bowling: आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवने त्याच्या गोलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली असून त्याचा आदर्श कोण आहे, याबद्दलही सांगितले आहे.
Mayank Yadav | Sunrisers Hyderabad | IPL 2024
Mayank Yadav | Sunrisers Hyderabad | IPL 2024Sakal

Mayank Yadav IPL Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 11 वा सामना एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात लखनौने 21 धावांनी विजय मिळवला. हा लखनौचा यंदाच्या हंगामातील पहिलाच विजय आहे.

दरम्यान, या सामन्यात लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या सामन्यातून पदार्पण करताना त्याच्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने या हंगामातील सर्वात वेगवान ताशी 155.8 किमी वेगाने चेंडूही टाकला.

इतकेच नाही, तर 21 वर्षीय मयंकने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये सातत्याने ताशी 140 किमी पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्यामुळे त्याचे अनेक दिग्गजांनीही कौतुक केले आहे.

Mayank Yadav | Sunrisers Hyderabad | IPL 2024
IPL 2024: 'कुठे लपला होतास?', 155.8kph वेगात बॉल टाकणाऱ्या मयंकवर डेल स्टेन, ब्रेट ली देखील खूश, पाहा कोण काय म्हणालं

दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मयंकने लोकांकडून त्याला मिळणाऱ्या गमतीशीर प्रतिक्रियेबद्दलही सांगितले. त्याने सांगितले की त्याला खूप जणांनी सांगितले आहे की तो थोडा सूर्यकुमार यादवसारखा किंवा जसप्रीत बुमराहसारखा दिसतो. हे नेहमीच त्याला ऐकायला लागते.

दरम्यान, मयंकला लखनौने 2022 च्या लिलावात 20 लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. पण तो 2022 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, तर 2023 आयपीएल हंगामातून तो दुखापतीमुळे बाहेर झाला होता. मात्र अखेर त्याला 2024 आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

त्याच्या वेगवान गोलंदाजीबद्दल तो म्हणाला, 'वेग हा मला नैसर्गिकरित्या मिळाला आहे. मी कधीही वेगातच गोलंदाजी करायची असा विचार करत नाही, त्यापेक्षा सातत्य राखण्यावर माझा भर असतो. वेग ही माझी ताकद आहे.'

Mayank Yadav | Sunrisers Hyderabad | IPL 2024
IPL 2024: सनरायझर्स हैदराबादला तिसऱ्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का! स्टार ऑलराऊंडर संपूर्ण हंगामातून बाहेर

पहिल्या आयपीएल सामन्याबद्दल मयंक म्हणाला, 'जेव्हा मी मैदानात गेलो, तेव्हा मला जाणवले की ही जागा माझ्यासाठीच आहे. सर्वजण म्हणाले की पहिल्या सामन्यात नर्व्हस व्हायला होतं वैगरे, पण मला फार काही वाटलं नाही. पहिल्या चेंडूनंतर सर्व सामन्यच वाटत होतं.'

डेल स्टेन, ब्रेट ली यांसारख्या जगभरात नावाजलेल्या वेगवान गोलंदाजांनीही मयंकचे कौतुक केले.

याबाबत बोलताना मयंक म्हणाला, 'मी लहानपणापासून या खेळाडूंना टीव्हीवर पाहिले आहे. त्यांच्याकडून कौतुक होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या वडिलांना वेगवान गोलंदाज आवडायचे, ते मला त्यांना दाखवायचे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, मिचेल जॉन्सन अशा गोलंदाजांना दाखवायचे.'

मयंकने असेही सांगितले की जसप्रीत बुमराह त्याचा आदर्श आहे. तो म्हणाला, 'मला बुमराहकडून प्रेरणा मिळते. तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडून शिकण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेल.'

याशिवाय लखनौचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरननेही मयंकचे कौतुक केले. तसेच त्याने म्हटले त्याचे भविष्य उज्वल आहे. तो अजूनही युवा असून अजून त्याला पुढे जायचे आहे.

मयंकने या सामन्यात 4 सामन्यांत 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना बाद केले. त्यामुळे 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 20 षटकात 5 बाद 178 धावांवर रोखण्यात लखनौला यश मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com