MI vs RCB IPL 2023: प्ले-ऑफसाठी रस्सीखेच! रोहितचा फॉर्म अन्‌ संघाच्या गोलंदाजीची चिंता

पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार महत्त्वाची लढत....
MI vs RCB IPL 2023
MI vs RCB IPL 2023

MI vs RCB IPL 2023 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आता प्ले ऑफसाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये आज (ता. ९) वानखेडे स्टेडियमवर महत्त्वाची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी १० सामन्यांमधून प्रत्येकी ५ विजयांसह १० गुणांची कमाई केली आहे.

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित चार लढतींपैकी किमान तीन लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे. याच कारणामुळे मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामधील लढत रोमहर्षक होण्याची दाट शक्यता आहे.

MI vs RCB IPL 2023
IPL 2023 : चुकीला माफी नाही! केकेआर जिंकला पण... कर्णधार नितीश राणाला BCCI ने केली मोठी शिक्षा

कर्णधार रोहित शर्मा याचा फलंदाजी फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्याला १० सामन्यांमधून १८.४० च्या सरासरीने फक्त १८४ धावाच करता आल्या आहेत. यामध्ये फक्त एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. मागील दोन लढतींमध्ये त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच मागील चार लढतींमध्ये तो एकेरी धावसंख्येवरच बाद झाला आहे.

रोहितच्या अपयशामुळे इतर फलंदाजांवरील दबाव वाढत आहे. इशान किशन (२९३ धावा), सूर्यकुमार यादव (२९३ धावा), तिलक वर्मा (२७४ धावा), कॅमेरून ग्रीन (२७२ धावा) व टीम डेव्हिड (१७९ धावा) यांच्याकडून मुंबईसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. मागील चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईची फलंदाजी कोसळली आणि तब्बल १३ वर्षांनंतर चेन्नईने मुंबईला चेन्नईमध्ये हरवले. त्यामुळे रोहितचे फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तो आयपीएलमधील काही सामन्यांमधून माघार घेण्याचीही शक्यता आहे.

MI vs RCB IPL 2023
Asia Cup 2023: जय शहाने केला गेम! पाकिस्तानकडून यजमानपद घेतलं काढून, या देशात होणार स्पर्धा?

गोलंदाजी विभागामध्येही मुंबईला खेळ उंचावावा लागणार आहे. पियूष चावलाने १० सामन्यांमधून १७ विकेट घेतल्या आहेत. त्याने ७.१७ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. पियूष वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला ठसा उमटवता आलेला नाही. जेसन बेहरेनडॉर्फ, रायली मेरेडीथ, कॅमेरून ग्रीन, अर्शद खान, जोफ्रा आर्चर यांना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.

महिपालकडून आशा

बंगळूरसाठी विराट कोहली (४१९ धावा), फाफ ड्युप्लेसी (५११ धावा) व ग्लेन मॅक्सवेल (२६२ धावा) यांनी आतापर्यंतच्या लढतींमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे. बंगळूर संघाच्या फलंदाजीची मदार या तिघांच्या खांद्यावरच आहे, पण दिल्लीविरुद्धच्या लढतीत महिपाल लोमरोर याने ५४ धावांची खेळी करताना आपल्यामध्येही अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com