Virat Kohli Sourav Ganguly : दादा दादाच असतो! 'पराभूत' विराटचं हस्तांदोलन करत सांत्वन?

Virat Kohli Sourav Ganguly
Virat Kohli Sourav Ganguly ESAKAL

Virat Kohli Sourav Ganguly : आयपीएल 2023 मध्ये आज अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताच्या दोन दिग्गज फंलंदाजांकडे सर्वांचे लक्ष होते. एक आक्रमकतेचं अक्राळ विक्राळ रूप विराट कोहली आणि भारतीय क्रिकेटधील दादा म्हणून ओळख असलेला सौरव गांगुली!

लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहलीने हस्तांदोलनावेळीच तुफान राडा घातला होता. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. विराट कोहलीची ही हस्तांदोलनावेळी अगाऊपणा करण्याची पहिलीच वेळ नव्हती. त्याने दिल्लीविरूद्ध बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात देखील सौरभ गांगुलीशी हस्तांदोलन करण्याचे टाळले होते.

Virat Kohli Sourav Ganguly
Philip Salt DC vs RCB : दुधात मिठाचा खडा! आरसीबीला दिल्लीच्या एकट्या फिल्प सॉल्टने धुतले

त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुली हे हस्तांदोलन करणार की तसेच पुढे निघून जाणार याची उत्सुकता होती. मात्र आजच्या सामन्यात सिराज सोडला तर विराट कोहलीने फारसे आक्रमक हावभाव केले नाही. विशेष म्हणजे सामना झाल्यानंतर विराट कोहली आणि सौरभ गांगुली यांना हस्तांदोलन करत कॅमेऱ्यासमोर तरी संभ्य आणि खिलाडू वृत्ती दाखवली. सौरव गांगुलीने विराटची पाठ थोपटत अर्धशतकी खेळीचे अप्रत्यक्ष कौतुक केले की पराभवाबद्दल सांत्वन केले हे काही समजले नाही.

Virat Kohli Sourav Ganguly
MS Dhoni On Matheesha Pathirana : धोनी ज्युनियर मलिंगा पथिरानाबद्दल म्हणाला, श्रीलंकेसाठी ठरणार स्टार मात्र...

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट्स राखून पराभव केला. दिल्लीने आरसीबीचे 182 धावांचे आव्हान 17 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केले. दिल्लीकडून फिल्प सॉल्टने 87 धावांची दमदार खेळी करत एकहाती सामना जिंकून दिला. त्याला रिले रूसोने नाबाद 35 धावा करत चांगली साथ दिली.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 181 धावा ठोकल्या. विराट कोहलीने 55 तर महिपाल लोमरोरने 54 धावा केल्या. फाफ ड्युप्लेसिसनेही 45 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com