DC vs RCB : विराटचे विक्रमी तर महिपालचे पहिले वहिले अर्धशतक, आरसीबीने दिल्लीसमोर ठेवले मोठे आव्हान

IPL 2023 RCB vs DC Virat Kohli
IPL 2023 RCB vs DC Virat Kohli esakal

IPL 2023 RCB vs DC Live Score : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 181 धावा ठोकल्या. विराट कोहलीने 55 तर महिपाल लोमरोरने 54 धावा केल्या. फाफ ड्युप्लेसिसनेही 45 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघाचा पॉवरप्ले संपला आहे. त्याने सहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या.

IPL 2023 RCB vs DC Virat Kohli
Virat Kohli IPL 2023 : इतिहास रचला! चौकार मारत विराट कोहली थाटात बनला 7 हजारी मनसबदार

विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने आरसीबीला 82 धावांची सलामी दिल्यानंतर मिचेल मार्शने आरसीबीला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने ड्युप्लेसिसला 45 धावांवर बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला. यानंतर विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान, विराट कोहलीने हंगामातील आपले 6 वे अर्धशतक झळकावले. मात्र या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला मुकेश कुमारने 55 धावांवर बाद केले.

IPL 2023 RCB vs DC Virat Kohli
CSK vs MI IPL 2023: 4777 दिवसांनंतर चेपॉकमध्ये धोनीच्या चेन्नईने मुंबई इंडियन्सचा केला पराभव

विराट कोहली बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 16 षटकात 137 धावा झाल्या होत्या. त्यानंतर महिपाल लोमरोरने आक्रमक फटकेबाजी करत 26 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक होते. याचबरोबर आरीसीबी 19 षटकात 3 बाद 172 धावांपर्यंत पोहचली होती. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने 11 धावा करून लोमरोरची साथ सोडली. त्यानंतर लोमरोर आणि रावतने शेवटच्या षटकात 9 धावा करत आरसीबीला 20 षटकात 4 बाद 181 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com