काळ बदलला, जग बदललं पण धोनीचा अंदाज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Run Out Glenn Maxwell

काळ बदलला, जग बदललं पण धोनीचा अंदाज...

MS Dhoni IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात बुधवारी आयपीएलचा (IPL) ४९ वा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७३ धावा केल्या. संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात कोणतीही चमत्कारिक कामगिरी करू शकला नाही. विराट कोहली आणि त्याच्यात गोंधळामुळे धोनीने मॅक्सवेलला 3 धावांवर धावबाद केले. धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले की वय त्याच्यासाठी फक्त एक संख्या आहे. माहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहतेही हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. (MS Dhoni Run Out Glenn Maxwell)

आरसीबी फलंदाजी करत असताना 9व्या षटकात विराट कोहलीने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर कव्हरवर शॉट मारला. आणि कोहली धाव घेण्यासाठी धावला. पण चेंडू उथप्पाच्या हातात गेला, त्यामुळे विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात थोडा गोंधळ उडाला. रॉबिन उथप्पाने पटकन चेंडू पकडला आणि माहीकडे फेकला. धोनीचा विजेसारखा वेग पाहून वाटत हे नाही त्यानी ४० शी ओलांडली असलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने हा सामना जिंकला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 160 धावा करता आल्या. आरसीबीकडून महिपाल लोमरने या सामन्यात ४२ धावा केल्या. तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाला चांगली सुरुवात करूनही लक्ष्य गाठता आले नाही.