MS Dhoni: धोनी IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच! फलंदाजी करताना झाला गोल्डन डक, पण यष्टीरक्षणावेळी रचला विश्वविक्रम

MS Dhoni Record: चेन्नई सुपर किंग्सचा यष्टीरक्षक एमएस धोनीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
MS Dhoni | CSK | IPL 2024
MS Dhoni | CSK | IPL 2024X/ChennaiIPL

MS Dhoni IPL Catches Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 53 वा सामना रविवारी (5 मे) पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवण्यात आला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 28 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान एमएस धोनीने यष्टीरक्षण करताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात धोनीला फलंदाजीत खास काही करता आले नव्हते. 9व्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीला पहिलाच चेंडू खेळताना हर्षल पटेलने शु्न्यावर त्रिफळाचीत केले. मात्र, नंतर यष्टीरक्षण करताना धोनीने चांगली कामगिरी केली.

MS Dhoni | CSK | IPL 2024
LSG vs KKR: फक्त गॉथम-रमणदीपनेच नाही, तर बाऊंड्री लाईनवर बॉल-बॉयनंही घेतला अफलातून कॅच; जॉन्टी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

त्याने 10 व्या षटकात सिमरजीतच्या गोलंदाजीवर यष्टीमागे जितेश शर्माचा झेल घेतला. हा धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक म्हणून घेतलेला 150 वा झेल ठरला. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात 150 झेल घेणारा पहिलाच खेळाडू ठरला.

यापूर्वी असा विक्रम कोणाला करता आलेला नाही. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीच्या पाठोपाठ दिनेश कार्तिक आहे. त्याने 144 झेल घेतले आहेत, तर एबी डिविलियर्सने 118 झेल घेतले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू

  • 150 झेल - एमएस धोनी (261 सामने)

  • 144 झेल - दिनेश कार्तिक (253 सामने)

  • 118 झेल - एबी डिविलियर्स (184 सामने)

  • 114 झेल - विराट कोहली (248 सामने)

  • 108 झेल - सुरेश रैना (205 सामने)

MS Dhoni | CSK | IPL 2024
IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

चेन्नईने जिंकला सामना

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 167 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ऋतुराज गायकवाड (32) आणि डॅरिल मिचेल (30) यांनी छोटेखानी खेळी केल्या.

पंजाबकडून गोलंदाजीत राहुल चाहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने 20 षटकात 9 बाद 139 धावाच केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 30 धावांची खेळी, तर शशांक सिंगने 27 धावा केल्या. मात्र, बाकी कोणाला विशेष काही करता आले नाही. चेन्नईकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com