IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

IPL 2024, LSG vs KKR: लखनौमध्ये आत्तापर्यंत टी20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याच संघाला न जमलेली कामगिरी कोलकाता नाईट रायडर्सने करून दाखवली आहे.
KKR | IPL 2024
KKR | IPL 2024Sakal

IPL 2024, LSG vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 54 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. या मैदानात खेळताना कोलकाताने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताकडून सुरुवातीला फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायणने आक्रमण केले. नारायणने आक्रमक अर्धशतकही केले. अखेरीस रमनदीप सिंगनेही तुफानी फटकेबाजी केली.

त्यामुळे या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 235 केल्या. त्यामुळे फक्त आयपीएलमध्येच नाही, तर टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाना स्टेडियमवर 200 धावांचा टप्पा पार झाला. या स्टेडियमवर टी20 मध्ये 200 धावा करणारा कोलकाता पहिला संघ ठरला.

KKR | IPL 2024
IPL 2024, CSK: चेन्नई टॉप 4 मध्ये तरी डोकेदुखी वाढली; धोनीचा लाडका बॉलर मायदेशी परतला; जाणून घ्या कारण

यापूर्वी या स्टेडियमवर टी20 क्रिकेटमध्ये 3 वेळा 199 धावा झाल्या आहेत. पण कोणालाही 200 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. भारतीय संघाने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध या स्टेडियमवर टी20 सामना खेळताना 2 बाद 199 धावा केल्या होत्या.

तसेच लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध या स्टेडियमवर खेळताना 8 बाद 199 धावा केल्या होत्या. तसेच आयपीएल 2024 मध्येच या स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने 19 षटकात 3 बाद 199 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर 2021 मध्ये या स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेतील गोवा विरुद्ध सामना खेळताना पंजाब राज्य संघाने 20 षटकात 4 बाद 197 धावा केल्या होत्या.

KKR | IPL 2024
MS Dhoni Video: हर्षल पटेलचा यॉर्कर अन् धोनी 'गोल्डन डक'वर परतला माघारी, यापूर्वी असं कधी झालंय?

कोलकाताचं लखनौसमोर 236 धावांचं लक्ष्य

दरम्यान, कोलकाताकडून सलामीवीर सुनील नारायणने 39 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान 6 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच फिलिप सॉल्टने 14 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 32 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर अंगक्रिश रघुवंशीनेही 3 चौकार आणि 1 षटकारासह 32 धावांची खेळी केली, तर अखेरीस रमणदीप सिंगने 6 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे कोलकाताला 235 धावांपर्यंत पोहचला आले आणि लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवता आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com