जडेजाच्या कर्णधारपदाबद्दल धोनीचा मोठा खुलासा, "तो फक्त..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ms dhoni ravindra jadeja csk ipl 2022

जडेजाच्या कर्णधारपदाबद्दल धोनीचा मोठा खुलासा, "तो फक्त..."

IPL 2022 : आयपीएलचा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी खासच होता. चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करत विजय मिळवला. आणि महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा कर्णधार म्हणून शानदार पुनरागमन केले. याआधी CSK ने रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली आठ सामने खेळले, त्यापैकी CSK ने सहा सामने हारले. सातत्याने पराभूत होत असताना रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मग महेंद्रसिंग धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले. धोनी कर्णधार बनताच पहिला सामना CSK ने जिंकला आहे. दरम्यान धोनीने रवींद्र जडेजाच्या कर्णधारपदाबाबतही मोठा खुलासा केला आहे. (MS Dhoni on Ravindra Jadeja's Captaincy)

हेही वाचा: उमरान मलिकच्या हंगामातील सर्वात 'वेगवान' चेंडूवर ऋतुराजचे अर्धशतक

कर्णधार एमएस धोनीने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्या नंतर रवींद्र जडेजा बाबत मोठा खुलासा केला. जडेजाला मागील हंगामापासून माहित होते की तो आयपीएल 2022 मध्ये सीएसकेचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजाला तयारीसाठी खूप वेळ होता. धोनीने खुलासा केला की पहिल्या काही सामन्यांमध्ये मी त्याला मदत केली, असेही तो म्हणाला. पण त्यानंतर मी सर्व निर्णय रवींद्र जडेजावर सोडले होते. महेंद्रसिंग धोनीने असेही सांगितले की सीझन संपेपर्यंत जडेजा फक्त मैदानावर नाणेफेकीसाठी जातो आणि बाकीचे निर्णय कोणीतरी घेत होते हे मला नको होते.

हेही वाचा: जडेजाच्या कर्णधारपदाबद्दल धोनीचा मोठा खुलासा, "तो फक्त..."

मैदानावर सामन्यादरम्यान अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयांची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागते. धोनीने सांगितले की, त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत असल्याचे त्याला वाटत होते. मला जडेजाला गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला आवडते. कर्णधारपदाचा जडेजाच्या खेळावरही परिणाम होत होता. आत्तापर्यंत CSK ने 17 ते 18 झेल सोडले आहेत, ही चिंतेची बाब आहे.

Web Title: Ms Dhoni Big Disclosure About The Captaincy Of Ravindra Jadeja Csk Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top