

MS Dhoni Update
esakal
WILL MS DHONI PLAY AT LEAST ONE MATCH IN IPL 2026?: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम अर्ध्यापेक्षा जास्त संपला आहे. आता या हंगामाचे काहीच आठवडे शिल्लक राहिले आहेत. या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकले आहेत, तर काही खेळाडू पूर्ण हंगामातूनच बाहेर झाले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सचाही(CSK) समावेश आहे. चेन्नईचा आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि खलील अहमद हे दोघे खेळाडू दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाले आहेत. त्याचबरोबर संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार एमएस धोनी(MS Dhoni) देखील दुखापतीमुळे १० सामन्यांना मुकला आहे. मात्र आता धोनीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.