MS Dhoni Video: हर्षल पटेलचा यॉर्कर अन् धोनी 'गोल्डन डक'वर परतला माघारी, यापूर्वी असं कधी झालंय?

MS Dhoni Video: पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीला रविवारी झालेल्या सामन्यात गोल्डन डकवर क्लिन बोल्ड केले, पाहा Video
MS Dhoni | IPL 2024
MS Dhoni | IPL 2024X/IPL

MS Dhoni Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 53 वा सामना रविवारी (5 मे) पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने शानदार कामगिरी केली.

त्याने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. या एक महत्त्वाची विकेट घेतली, ही विकेट होती चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीची.

या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मात्र सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यांनी चांगला खेळ केला होता.

मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. दरम्यान धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे 17 व्या षटकानंतर विकेट पडली, तर फलंदाजीला येताना दिसला आहे. त्यामुळे या सामन्यात धोनी तब्बल 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. तो टी20 कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

MS Dhoni | IPL 2024
PBKS vs CSK Play Off Equation : प्ले ऑफचं अजब गणित; पंजाब जिंकली तर तब्बल 9 संघांना फायदा अन् चेन्नई जिंकली तर फक्त...

या सामन्यात 18 व्या षटकात हर्षल पटेलने चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला 17 धावांवर त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर धोनी फलंदाजीला आला.

त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना हर्षलने या षटकातील 5 वा चेंडू स्लोअर यॉर्कर टाकला. त्यावर धोनी शॉट खेळण्यास चूकला, त्यामुळे चेंडूने ऑफ स्टंम्प उडवला. त्यामुळे धोनीला पहिल्याच चेंडूवर शून्यावर (गोल्डन डक) बाद होत माघारी परतावे लागले.

दरम्यान, धोनी पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची आयपीएलमधील ही चौथी वेळ होती. यापूर्वी सर्वात आधी 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात, त्यानंतर 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धोनी गोल्डन डकवर बाद झाला आहे.

MS Dhoni | IPL 2024
Ruturaj Gaikwad CSK vs PBKS : मी 10 टॉस हरलोय मात्र... पुन्हा नाणेफेक गमावल्यानंतर ऋतुराजचं मोठं वक्तव्य

हर्षल पटेलने दुसऱ्यांदा केलं धोनीला बाद

यंदाच्या हंगामात शानदार खेळणारा धोनी केवळ दुसऱ्यांदाच बाद झाला आहे. विशेष म्हणजे तो दोन्हीवेळी पंजाब किंग्सविरुद्धच बाद झाला आहे. त्याला चेपॉकला झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही हर्षल पटेलनेच धावबाद केले होते.

चेन्नईचे पंजाबला 168 धावांचे लक्ष्य

चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ऋतुराज गायकवाडने 32 आणि डॅरिल मिचेलने 30 धावांची खेळी केली.

पंजाबकडून गोलंदाजीत राहुल चाहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर सॅम करनने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com