
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (२० मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात संघात सामना झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा हा हंगामातील १० वा पराभव आहे.
दरम्यान, असे असले तरी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीने या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले.