IPL 2021 FINAL Video: MS धोनीने कॅच घेण्यासाठी मारली उडी अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL FINAL Video: MS धोनीने कॅच घेण्यासाठी  मारली उडी अन्...

CSK vs KKR: व्यंकटेश अय्यरच्या बॅटला लागून चेंडू वेगाने धोनीकडे गेला

IPL FINAL Video: MS धोनीने कॅच घेण्यासाठी मारली उडी अन्...

IPL 2021 Final CSK vs KKR: महेंद्रसिंग धोनीच्या CSK ने फायनलमध्येही दमदार कामगिरी करत प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावा केल्या आणि KKR ला १९३ धावांचे आव्हान दिले. फाफ डू प्लेसिसने ५९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाड (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७*) या तिघांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळेच संघाला १९० पार मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना KKRच्या व्यंकटेश अय्यरला दुसऱ्याच षटकात जीवदान मिळाले.

हेही वाचा: IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

कर्णधार म्हणून आपला ३००वा टी२० सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या हातून एक चूक घडली. KKR कडून तुफान फॉर्मात असलेल्या व्यंकटेश अय्यरचा झेल धोनीकडून सुटला. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर फटका मारताना अय्यरच्या बॅटची कड चेंडूला लागली. चेंडू धोनी कडे जात असल्याचे पाहताच धोनीने हात वरती केले पण त्याला झेल पकडता आला नाही.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: IPL FINAL Live: डू प्लेसिसचा धमाका; KKRला १९३ धावांचे आव्हान

दरम्यान, या जीवदानानंतर कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. पॉवर प्ले च्या ६ षटकात एकही बळी न गमावता KKR ने ५१ धावांची भागीदारी केली.

loading image
go to top