MS Dhoni reveals why he bats lower in the order for CSK in IPL 2025 : शुक्रवारी चेन्नईत झालेल्या आयपीएल 2025 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने (आरसीबी) चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेंगलुरुने 20 षटकांत 196 धावा उभारल्या आणि चेन्नईसमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकांत केवळ 8 बाद 146 धावाच करता आल्या.