
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (७ मे) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर हा सामना पार पडला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून दोन वेगवेगळे विक्रम नावावर केले आहेत.