CSK प्लेऑफमध्ये न पोहोचण्याच्या चर्चांदरम्यान धोनीचं मोठं विधान; म्हणाला...

विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला CSK प्लेऑफमध्ये...
ms dhoni
ms dhoni

आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना खेळला गेला. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी विजय मिळवला. विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला, सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. पण सर्व काही दुसऱ्या संघावर अवलंबून आहे. चेन्नईचे आता 11 सामन्यामध्ये 8 गुण आहेत. त्याना आता पुढील सामने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचे आहेत.

ms dhoni
कोलकतासमोर मुंबईचे आव्हान; नवी मुंबईत आज रंगणार लढत

चेन्नई सुपर किंग्सने हे सर्व सामने जिंकले तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा राहतील. मात्र एकाच सामन्यात संघ पराभूत झाल्यास स्पर्धेतून बाहेर पडेल. सध्या दोन संघांचे 16-16 गुण आहेत आणि दोघांचे 14-14 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या समीकरणाबाबत म्हणाला, सामना मोठ्या फरकाने जिंकल्याने फायदा झाला. पण हा विजय आधी मिळाला असता तर बरे झाले असते. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचे होते. सलामीवीरांनी चांगली धावसंख्या उभारली ज्यामुळे गोलंदाजीना ही मदत मिळाली.

ms dhoni
'मान ताठ करून चाल नाही तर तुझा मुकूट खाली पडेल'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सुपर किंग्जकडून डेव्हॉन कॉनवेने 49 चेंडूंत पाच षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. त्याने ऋतुराज गायकवाड 41 सोबत पहिल्या विकेटसाठी 110 धावांची आणि शिवम दुबे (32) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केल्याने संघाने 6 बाद 208 धावा केल्या. चेन्नईने ठेवलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 117 धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. सीएसकेकडून मोईन अलीने 3 तर सिमरजीत, ब्राव्हो आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com