'मान ताठ करून चाल नाही तर तुझा मुकूट खाली पडेल' | IPL 2022 Virat Kohli Golden Duck Social Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Virat Kohli Golden Duck Social Media

'मान ताठ करून चाल नाही तर तुझा मुकूट खाली पडेल'

मुंबई : आयपीएलच्या 54 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) सनराईजर्स हैदराबादचा 67 धावांनी पराभव करत 14 गुणांपर्यंत मजल मारली. आजच्या सामन्यात आरसीबीने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी केली. तरीदेखील आरसीबी फॅन्सच्या मनात एक सल राहिलीच. त्यांचा लाडका फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा गोल्डन डकचा (Golden Duck) शिकार झाला. तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहली तिसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद होऊन खाली मान घालून पॅव्हेलियनमध्ये परतला.

विशेष म्हणजे विराट कोहली यापूर्वीच्या 14 आयपीएल हंगामात सहा वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. मात्र यंदाच्या हंगामात तो तब्बल तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला. तसेच हैदराबाद विरूद्ध किंवा एकाच संघाविरूद्ध दोन वेळा गोल्डन डकवर बाद होण्याचे अप्रीय रेकॉर्ड देखील विराटने आपल्या नावावर केले. दरम्यान, विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची प्रतिक्रिया (Social Media Reaction) लगेच उमटली. नेटकऱ्यांनी #ViratKohli हा ट्रेंड सुरू केला. मात्र नेटकऱ्यांनी आपल्या हिरोला पडत्या काळात ट्रोल न करता त्याला पाठिंबा दिला.

एका नेटकऱ्याने तर सामना जिंकू दे, पराभव होऊ दे, शंभर होऊ दे किंवा शुन्यावर बाद होऊ दे मी मरेपर्यंत विराटचा फॅन राहणार असे म्हणत विराटला पाठिंबा दिला.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने विराटला ताठ मानेने पॅव्हेलियनकडे जाण्याचा सल्ला दिला. तो म्हणतो की, मान ताठ करून चाल नाहीतर तुझा मुकूट खाली पडेल.

Don't bow your head down KING,

Your CROWN will fall.#Kohli#ViratKohli????#RCBvSRH#IPL2022pic.twitter.com/y5mFNLkZP7

— Prabhat ???????? ???? (@mai_wahi_hoon) May 8, 2022

अजून एका नेटकऱ्याने मी विराट कोहलीच्या फक्त शंतकांचा फॅन नाही असे देखील म्हटले.

या हंगामात अशा पद्धतीने विराटला पॅव्हेलियनमध्ये जाताना पाहवत नाही. अशी पोस्ट देखील एका विराटप्रेमीने दिली.