IPL 2025: कोणाची किती हवा? CSK अन् RCB चाहत्यांची रंगली जुगलबंदी, सोशल मीडियावर मांडले क्रेझचे सर्व्हे

CSK vs RCB IPL 2025: आज चेन्नईत घरच्या मैदानावर सीएसके विरूद्ध आरसीबी सामना रंगणार आहे, सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या चाहत्यांची सोशल मीडियावर जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
MS Dhoni vs Virat Kohli Craze Survey in India
MS Dhoni vs Virat Kohli Craze Survey in Indiaesakal
Updated on

CSK vs RCB Craze Survey : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघांदरम्यान एमए चिदंबरम मैदानावर सामना रंगणार आहे. या सामन्याची लोकांमध्ये फारच क्रेझ आहे. चाहत्यांनी सामन्याच्या तिकीट खरेदीलाही चांगला प्रतिसाद दिला. दोन्ही संघाच्या समर्थकांकडून आठवडाभरापासून सोशल मीडियावर वातावरण निर्मिती केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील व्हायरल केले जात आहेत. त्यात सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सकडून दोन्ही संघांच्या क्रेझचा सर्व्हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. त्यानंतर आता चाहत्यांमध्ये संघाच्या क्रेझवरून जुगलबंदी रंगली आहे. (CSK vs RCB)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com