MS Dhoni: धोनीने संतापून कॅमेरामनवर उगारली पाण्याची बॉटल, नक्की असं झालं तरी काय?

MS Dhoni Video: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा यष्टीरक्षक एमएस धोनी कॅमेरामनवर चिडल्याचे दिसले.
MS Dhoni
MS DhoniSakal

MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सामना झाला. या सामन्यात लखनौने अखेरच्या षटकात 6 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

दरम्यान, यंदाच्या हंगामात चेन्नईचा हा घरच्या मैदानावरील पहिलाच पराभव आहे. याआधी चेपॉक स्टेडियमवर झालेल्या तिन्ही सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता. दरम्यान, या सामन्यावेळी चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी कॅमेरामनवर चिडताना दिसला.

MS Dhoni
Sachin Tendulkar Birthday: जेव्हा युवा सचिन भेटलेला दिग्गज सर डॉन ब्रॅडमनला; काय झालेलं त्या भेटीत

झाले असे की चेन्नई संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात कॅमेरा ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या एमएस धोनीसमोर गेला. त्यावेळी ऋतुराज ९३ धावांवर खेळत होता आणि शतकाच्या जवळ होता. पण त्यावेळी कॅमेरा समोर आलेला पाहून धोनी रागावल्याचे दिसला आणि त्याने पाण्याची बॉटल त्यावर उगारली. या घटनेचे फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

खरंतर प्रेक्षकांकडून सध्या धोनीला मोठा पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे बऱ्याचदा कॅमेरामन त्याच्यावर कॅमेरा फोकस करताना दिसतो.

MS Dhoni
Team India Squad T20 WC 2024 : टीम इंडियाला मिळाला रोहितचा पार्टनर! 7 षटकार 9 चौकार मारत ठोकले तुफानी शतक

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली. तसेच शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावांची खेळी केली. लखनौकडून मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनौने 19.3 षटकात 213 धावा करत पूर्ण केला. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने 63 चेंडूत सर्वाधिक 124 धावांनी नाबाद खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 34 धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 2 विकेट्स घेतल्या, तर दीपक चाहर आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com