Mumbai Indians: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी असलेले विविध देशातील खेळाडू भारतात असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहस्यही आहेत. त्यांचे काही व्हिडिओही व्हायरल होत असतात. तसेच काही गमतीशीर व्हिडिओ फ्रँचायझी देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नुकताच असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे तो अफगाणिस्तानचा अनुभवी मोहम्मद नबी आणि त्याच्या मुलाचा. नबी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याच्या मुलाबरोबर सहज क्रिकेट खेळत असातानाचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की नबी गोलंदाजी करत आहे, तर त्याचा मुलगा फलंदाजी करत आहे. यावेळी नबीने टाकलेल्या एका चेंडूवर त्याच्या मुलाने अफलातून हेलिकॉप्टर शॉट खेळला. त्याने ज्या कौशल्याने हा हेलिकॉप्टर शॉट खेळला, त्याचे कौतुक होत आहे.
त्याचा हा शॉट पाहून अनेकांना एमएस धोनीचीही आठवण झाली. हेलिकॉप्टर शॉट हा धोनीचा ट्रेडमार्क शॉट असून त्यासाठी तो ओळखला जातो.
'अन् नबीने षटकार मारला, लाईक फादर, लाईक सन', असे कॅप्शन देत मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे.
नबी गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही भाग राहिला आहे. त्याला आयपीएल 2024 लिलावातून मुंबई इंडियन्सने 1.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
दरम्यान, नबी आयपीएल 2024 हंगामात अद्याप एकच सामना खेळला आहे. त्याला मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यासाठी संघात स्थान दिले होते. पण या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर गोलंदाजी करताना त्याने एकही विकेट न घेता 17 धावा दिल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.