PBKS vs MI: पंजाबविरुद्ध रोमांचक विजयानंतरही हार्दिक पांड्यावर BCCI कडून कारवाई; सामन्यात झालेली 'ही' चूक

Mumbai Indians: पंजाब किंग्स विरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळवल्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे, यामागील कारण जाणून घ्या.
Hardik Pandya
Hardik PandyaSakal

Hardik Pandya News: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेत ३३ वा सामना गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. मुल्लनपूर येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने 9 धावांनी रोमांचक विजय मिळवला. मात्र, असे असले तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मोठा धक्का बसला आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा कर्णधार या नात्याने हार्दिकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Hardik Pandya
Sam Curran Toss PBKS vs MI : काय भरोसा खात्री केलेली बरी... सॅम करनच्या कृतीनं मुंबई इंडियन्सभोवती वाढले संशयाचे ढग?

याबाबत बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात माहिती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2024 मध्ये षटकांची गती कमी राखण्याची ही पहिलीच वेळ असल्याने केवळ कर्णधारावर 12 लाखांच्या दंडाची कारवाई झाली आहे.

सामन्यादरम्यानही कारवाई

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे षटकांची गती कमी राखण्याच्या नियमानुसार मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दोन षटकांत फक्त चारच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता आले होते.

Hardik Pandya
Champions League : रेयाल माद्रिदकडून गतवर्षाच्या पराभवाची परतफेड; पेनल्टी शूटआउटवर गतविजेत्या मँचेस्टर सिटीवर मात

मुंबईचा रोमांचक विजय

या सामन्यांत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. तसेच रोहित शर्माने 36 आणि तिलक वर्माने 34 धावांची खेळी केली. पंजाब किंगकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पंजाब किंग्स संघाला 19.1 षटकात सर्वबाद 183 धावाच करता आल्या. पंजाबकडून अशुतोष शर्माने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली, तसेच शशांक शर्माने 41 धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com