खराब संघरचनेमुळे मुंबईची ही अवस्था : जयवर्धने

Mumbai Indians coach Mahela Jayawardene
Mumbai Indians coach Mahela Jayawardene ESAKAL

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) खराब कामगिरीमुळे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान, मुंबईच्या यंदाच्या हंगामातील सलग आठ पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी पराभवाची कारण मिमांसा केली. त्यांनी मुंबई इंडियन्स मोक्याच्या क्षणी प्लॅन कार्यान्वित करण्यात कमी पडले. याचबरोबर याला संघाचे खराब स्ट्रक्चर (Poor Line Up) देखील कारणीभूत ठरले. यामुळे मुंबई सध्या गुणतालिकेत तळात राहिली आहे.

Mumbai Indians coach Mahela Jayawardene
हैदराबादने आरसीबीचा 'वेगवान गोलंदाज' लावला गळाला

मुंबई इंडियन्सने आठ पराभवानंतर राजस्थानचा पराभव करत आपला हंगामातील पहिला विजय मिळवला. चाहत्यांच्या मनात पाच वेळाच्या विजेत्या मुंबईच्या खराब कामगिरीची सल मात्र तशीच आहे. मुंबईच्या कामगिरीबाबत बोलताना प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाला की, 'संघ म्हटलं की सांघिक कामगिरी करणं गरजेचं असतं. हे एका कोणा व्यक्तीचं काम नाही. तुम्ही मैदानात तुमचा प्लॅन कसा कार्यान्वित करता यावर यश अवलंबून असते. यंदाच्या हंगामात आम्ही जी संघ बांधणी केली. तेथे आम्ही थोडे कमी पडलो.' जवर्धनेने रोहित शर्माच्या खराब कामगिरीबद्दल बोलताना हे उत्तर दिले.

Mumbai Indians coach Mahela Jayawardene
दादा राजकारणाच्या खेळपट्टीवर फटकेबाजी करणार? अमित शाह घेऊ शकतात भेट

जयवर्धने पुढे म्हणाले की, याच बरोबर आमच्याकडे मॅच फिनिशर देखील तगडे नव्हते. संघातील बरेच खेळाडू मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही कमी पडलो. हा असा एक हंगाम आहे की जेथे आम्ही अटीतटीचे सामने जिंकण्यात अपयशी ठरलो. याचबरोबर आमचे प्रमुख फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले. एका कोणा व्यक्तीमुळे हे झाले नाही. संघ म्हणू सर्वच जण सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com