
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला स्थगितीनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. पण यामुळे अनेक फ्रँचायझींना आपल्या संघात बदल करावे लागले आहेत. बरेच संघांचे काही परदेशी खेळाडू आयपीएल २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक आठवडाभराने पुढे गेल्याने उपलब्ध राहू शकत नाही, तर काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
अशात फ्रँचायझींना त्यांच्या बदली खेळाडूंची घोषणा करावी लागली आहे. नुकतेच कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनीही बदली खेळाडूंची घोषणा केली आहे.