VIDEO : रोहितचा एका षटकाराने मिळाले एक शिंगी गेंड्याला पाच लाख रूपये | Rohit Sharma Six hit Tata Punch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Six hit Tata Punch

VIDEO : रोहितचा एका षटकाराने मिळाले एक शिंगी गेंड्यांना पाच लाख रूपये

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आजच्या सामन्यात संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. त्याने 2 षटकार आणि 5 चौकारांच्या साथीने 28 चेंडूत 43 धावा चोपल्या. त्याने मारलेल्या एक षटकार (Six) हा विशेष ठरला. त्याच्या या षटकारामुळे आता आसाममधील एक शिंगी गेंड्याला (Rhino) पाच लाख रूपये गिफ्ट मिळणार आहेत. रोहित शर्माने हा षटकार दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डीम मिडविकेटला एक जबरदस्त षटकार मारला.

हेही वाचा: MI vs GT : 'रोहित, पोलार्ड, बुमराहला आता विश्रांती द्या'

अल्झारी जोसेफच्या पायाच्या दिशेने येणाऱ्या चेंडूवर रोहितने फ्लिक मारत षटकार खेचला. चेंडू डीप मिडविकेट बाऊंडरीच्या बाहेर गेला. हा चेंडू थेट टाटा पंच (Tata Punch) या शोकेस केलेल्या गाडीवर जाऊन आदळला. रोहितच्या या षटकारामुळे आता आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कला (Kaziranga National Park) पाच लाख रूपये मिळणार आहेत. रोहित हा प्राण्यांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे.

हेही वाचा: IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

टाटा मोटर्स ही आयपीएलची अधिकृत स्पॉन्सर आहे. या ग्रुपने घोषणा केली होती की एखादा फलंदाज जर टाटा पंचच्या बोर्डवर किंवा टाटा पंच कारवर चेंडू मारेल तेव्हा कंपनी काजीरंगा नॅशनल पार्कला 5 लाख रूपये दान करणार आहे. हे नॅशनल पार्क एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: कनेरियावर धर्मांतरासाठी दबाव... काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने प्रथम मुंबईला फलंदाजीला पाचारण केले. मुंबईने गुजरात टायटन्ससमोर 177 धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोहित शर्माने देखील आक्रमक सुरूवात करत 43 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने देखील तिलर वर्मासोबत भागीदारी रचत मुंबईला 150 च्या पार पोहचवले. त्याने 21 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. यामुळे मुंबईला 177 धावांपर्यंत मजल मारता आली.

Web Title: Rohit Sharma Six Hit Tata Punch Will Help Kaziranga National Park Rhino With 5 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top