खेळाडूंना उसंत नाही! भारताचा विंडीज दौरा झाला फिक्स, अमेरिकेतही सामने? | Team India West Indies Tour | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India West Indies Tour Start From 22nd July

खेळाडूंना उसंत नाही! भारताचा विंडीज दौरा झाला फिक्स, अमेरिकेतही सामने?

नवी दिल्ली : भारतातील आयपीएलचा हंगाम शेवटाकडे येत असतानाच टीम इंडियाचा (Tem India) पुढच्या दौऱ्यांची एका पाठोपाठ एक तारखा जाहीर होत आहेत. भारतीय संघ आता जुलै महिन्यात वेस्ट इंडीजचा दौरा (West Indies Tour) करणार आहे. 22 जुलैपासून हा दौरा सुरू होईल. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. हे सामने त्रिनिदाद आणि सेंट किट्समध्ये खेळवले जाणार आहेत. काही टी 20 सामने हे अमेरिकेतील फ्लोरिडातही (America Florida) खेळवले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कनेरियावर धर्मांतरासाठी दबाव... काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

क्रिकबझ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडीज दौऱ्यावरील तीन वनडे हे 22, 24 आणि 27 जुलैला खेळवले जाणार आहेत. हे तीनही सामने त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओवलमध्ये खेळले जाणार आहेत. त्यानंतर चार्ल्स लारा स्टेडियमवर 29 जुलैला पाच टी 20 सामन्यातील पहिला सामना खेळला जाणार आहेत. त्यानंतर पुढचे दोन टी 20 सामने हे 1 आणि 2 ऑगस्टला सेंट किट्स आणि नेविसच्या वॉर्नर पार्कवर खेळवण्यात येतील. त्यानंतर दोन्ही संघ फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरडेलसाठी रवाना होणार आहे. इथे उरलेले दोन टी 20 सामने 6 आणि 7 ऑगस्टला खेळवले जातील. मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडीज अमेरिकेत सामने खेळवण्याबाबत परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. परवानगी मिळाल्यानंतर याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

हेही वाचा: IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

भारतीय संघ 18 जुलैनंतर युकेमधून त्रिनिदादसाठी रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये भारत एक कसोटी सामना, तीन वनडे सामने आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. दरम्यान, भारत विदेशी दौऱ्यावर खेळाडूंवर कडक बायो बबलचे नियम लागू करणार नसल्याचे वृत्त आहे. सध्या जगभरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. सगळीकडे निर्बंधही शिथील करण्यात आले आहे.

Web Title: Team India West Indies Tour Start From 22nd July Some Matches In America Florida

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top