Mumbai Indians च्या चाहत्यांचा आत्मविश्वास.... पंजाब किंग्ससाठी खास पोस्टर घेऊन पोहोचले स्टेडियमवर

Mumbai Indians Fans’ Poster Creates Buzz: पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर झळकवलेल्या एका पोस्टरची सध्या चर्चा रंगली आहे.
Mumbai Indians Fans Poster
Mumbai Indians Fans PosterSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा विजेता कोण होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. १० संघांमधून आता अंतिम तीन संघ निश्चित झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तर अंतिम सामन्यातही स्थान मिळवले आहे.

आता रविवारी (१ जून) अंतिम सामन्यात पोहणारा दुसरा संघ निश्चित होणार आहे. रविवारी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ बंगळुरूविरुद्ध अंतिम सामन्यात खेळणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपेल.

Mumbai Indians Fans Poster
ऐ, शुकशुकssss, ऐकना...! PBKS vs MI सामना सुरू असताना Akash Ambani यांचा श्रेयसशी बोलण्याचा प्रयत्न, भारी होती अय्यरची नजर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com