
Mahela Jayawardene expresses disappointment
मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर १० वर्षांनी पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएलचे दुसरे पर्व खेळतेय, परंतु त्यांना अपेक्षित निकाल काही मिळताना दिसत नाही. यंदाच्या पर्वात मुंबईला आतापर्यंत ५ सामन्यांत ४ पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता त्यांना कंबर कसून खेळ करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या अपयशावर मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने याने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.