
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी पंजाब किंग्सने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना होता. पण दोन्ही संघांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.मात्र आता या सामन्यानंतर कोणता संघ कोणता सामना खेळणार हे निश्चित झाले आहे.