प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी DC ला विजय आवश्यक; अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी DC ला विजय आवश्यक; अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी!

प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी DC ला विजय आवश्यक; अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी!

IPL 2022: आयपीएलचा यंदाचा मोसम आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंटस्‌ या दोन नव्या संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान निश्‍चित करीत महालिलावात आपण योग्य खेळाडूंवर बोली लावली याची प्रचिती दिली. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली कॅपिटल्सचा संघही प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज होणारी मुंबई इंडियन्सविरुद्धची लढत दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘उपांत्यपूर्व‘ लढतीप्रमाणेच असणार आहे. या लढतीत चांगल्या नेट रनरेटने विजय मिळवल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येईल. मात्र मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यास त्यांचा खेळ साखळीतच खल्लास होणार आहे.

हेही वाचा: गावसकर यांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ; शिमरॉन हेटमायरच्या पत्नीवर केले भाष्य

दिल्ली संघासाठी यंदाचा मोसम आतापर्यंत समाधानकारक ठरला आहे. या संघात सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. दिल्लीने या मोसमात १३ लढती खेळलेल्या आहेत. यापैकी ७ लढतींमध्ये या संघाने विजय मिळवला असून ६ लढतींमध्ये त्यांना हार सहन करावी लागली आहे. दिल्ली संघाची अखेरची लढत मुंबईविरुद्ध होणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश पक्का होण्याची शक्यता आहे.

सातत्याचा अभाव

डेव्हिड वॉर्नर (४२७ धावा), मिचेल मार्श (२५१ धावा), रोवमन पॉवेल (२०७ धावा) यांची दमदार फलंदाजी, कुलदीप यादव (२० बळी) याची प्रभावी गोलंदाजी व अक्षर पटेल (६ बळी, १६३ धावा), ललित यादव (४ बळी, १६१ धावा) यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दिल्लीला अद्यापही प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा आहे. पण त्यांना दोन बाबींवर मेहनत घ्यावी लागणार आहे. रिषभ पंत (३०१ धावा) याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. त्याच्याकडून मोठी खेळी होत नाही.

हेही वाचा: सौरव गांगुलीचा ४० कोटींचा 'महाल' आतून कसा दिसतो? पाहा फोटो!

अर्जुनला संधी?

मुंबईसाठी आजची लढतही प्रतिष्ठेची असणार आहे. हा मोसम त्यांच्यासाठी विसरण्यासारखाच ठरला आहे. दिल्लीविरुद्ध त्यांचा अखेरचा सामना असणार आहे. या लढतीत बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागील दोन मोसम बाकावर बसला आहे. आता तरी त्याला संधी मिळेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिलक वर्मा व टीम डेव्हिड या दोन खेळाडूंनी या मोसमात आपला ठसा उमटवला आहे.

Web Title: Mumbai Indians Vs Delhi Capitals 69th Match Dc Need Win Playoffs Mi Will Arjun Tendulkar Playing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..