गावसकर यांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ; शिमरॉन हेटमायरच्या पत्नीवर केले भाष्य

सुनील गावसकर शिमरॉन हेटमायरच्या पत्नीच्या टिप्पणीसाठी झाले ट्रोल
 Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment
Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment

आयपीएलच्या 68 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळा गेला. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानच्या विजयात खरा हिरो ठरला अश्विन. त्याने 40 धावांची नाबाद खेळी खेळली आणि 1 विकेट घेतला. चेन्नईने या पराभवासह हंगामाचा शेवट केला. या हंगामात चेन्नईला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. परंतु संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे पुढच्या हंगामात धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार म्हणून खेळणार आहे.(Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment)

 Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment
धोनीने शेवटच्या सामन्यात पुढच्या हंगामाबाबत दिले 'महत्वाचे' संकेत

कालच्या राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात मोईन अली आणि अश्विनने चाहत्याचे मन जिंकले. दुसरीकडे सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) वर काही बोलले आणि त्याला आता वादाचे रूप मिळाले आहे. गावसकर यांच्या कमेंटवर चाहते सोशल मीडियावर टीका करत आहेत.

 Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment
RR vs CSK : अश्विन ठरला तारणहार! राजस्थान खेळणार थेट क्वालिफायर

राजस्थानला विजयासाठी 52 चेंडूत 75 धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानकडून क्रीझवर फलंदाजीला हेटमायर आला. तेव्हा गावसकर यांनी त्यांच्यासाठी असे काही शब्द वापरले ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गावसकर म्हणाले, शिमरन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का?

 Sunil Gavaskar trolled Shimron Hetmyer Comment
IPL 2022: चेन्नईविरुद्ध मला माझा 'A' गेम खेळायचा होता - अश्विन

गावसकर यांच्या या वक्तव्यानंतर चाहते आता सोशल मीडियावर जोरदार टीका करत आहेत. काही चाहते त्याला कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणीही करत आहेत. मात्र हेटमायरला या सामन्यात विशेष काही करता आले नाही आणि तो 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. गावसकर यांनी यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल टिप्पणी केली होती आणि त्यानंतरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com