RCB vs LSG: तीन कॅच अन् रॉकेट थ्रो! फक्त तुफानी फलंदाजीच नाही, तर पूरनने फिल्डिंगमध्येही खाल्ला भाव; पाहा Video

Nicholas Pooran Fielding: लखनऊ सुपर जायंट्स संघाचा उपकर्णधार निकोलस पूरनने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फक्त फलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही कमाल केली.
Nicholas Pooran | IPL 2024 | RCB vs LSG
Nicholas Pooran | IPL 2024 | RCB vs LSGSakal

Nicholas Pooran News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला. हा लखनऊचा सलग दुसरा विजय ठरला, तर बेंगळुरूला घरचेच मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यात लखनऊसाठी उपकर्णधार निकोलस पूरनची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने आक्रमक फलंदाजी करण्याबरोबरच क्षेत्ररक्षणातही मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊकडून क्विंटन डी कॉक 81 धावांवर बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 21 चेंडूत नाबाद 40 धावा ठोकताना 1 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे लखनऊला 20 षटकात 5 बाद 181 धावांपर्यंत पोहचता आले.

Nicholas Pooran | IPL 2024 | RCB vs LSG
Mayank Yadav Video: मयंकच्या वेगानं RCB चे फलंदाज गारद! 156.7kph स्पीडचा बॉल टाकत रचला नवा विक्रम

त्यानंतर 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पूरनने तीन झेल घेतले आणि एक धावबादही केला. त्याने आधी सहाव्या षटकात मयंक यादवने टाकलेल्या ताशी 151 किमी वेगाच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचा मिड-ऑनला झेल घेतला.

त्यानंतर त्याने आरसीबीकडून 13 चेंडूत 33 धावा करणाऱ्या महिपाल लोमरोरचा 18 व्या षटकात डाव्या हाताने झेल घेतला. त्याआधी याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोमरोरने मारलेल्या शॉटवर मयंक डागरला त्याने धावबाद केले.

लोमरोर आणि डागर यांनी एक धाव पूर्ण केली होती. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पळत असतानाच पूरनने चेंडू पकडला. त्याचवेळी मयंक परत माघारी फिरला पण तो पुन्हा क्रिजमध्ये येण्यापूर्वीच पूरनने थेट स्टंपवर थ्रो करत त्याला बाद केले.

Nicholas Pooran | IPL 2024 | RCB vs LSG
IPL 2024 Two Match Changes : आयपीएलच्या दोन सामन्यांत बदल ; कोलकतामधील लढत १७ ऐवजी १६ एप्रिल रोजी

इतकेच नाही, तर अखेरच्या षटकात नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने मोठा शॉट खेळला होता. पण लाँग-ऑनपासून पळत येत डाईव्ह मारत पूरनने त्याचाही झेल घेतला आणि यासह बेंगळुरूचा डावही 153 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे लखनऊने विजयही निश्चित केला.

या सामन्यात लखनऊकडून गोलंदाजीत मयंक यादवने शानदार कामगिरी केली. त्याने 4 षटकात 14 धावाच देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हकनेही 2 विकेट्स घेतल्या, तर मनिमारन सिद्धार्थ, यश ठाकूर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com