
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बुधवारी (२१ मे) दिल्ली कॅपिटल्सला वानखेडे स्टेडियमवर ५९ धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्येही स्थान मिळवले.
मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा मुंबई इंडियन्स चौथा संघ ठरला आहे. त्यामुळे आता पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला सहाव्या विजेतेपदाची संधी आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स जिंकल्यानंतर संघमालकीण नीता अंबानी यांनी केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.