IPL 2025 disappointing performances from top paid players
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रिषभ पंत ( Rishabh Pant) आणखी एका सामन्यात अपयशी ठरला. दिल्ली कॅटिपल्सविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रक्कम मोजून रिषभला मोठ्या आशेने आपल्या ताफ्यात घेतले, पंरतु त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. रिषभ हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे आणि त्याचे अपयश टीकाकारांना संधी देत आहे. पण, आयपीएल २०२५ मध्ये मोठी रक्कम मिळूनही अपयशी ठरलेला रिषभ पंत एकटाच नाही.